Jump to content
Wikimedia Meta-Wiki

ध्येय

From Meta, a Wikimedia project coordination wiki
This page is a translated version of the page Mission and the translation is 86% complete.
Other languages:
Spoken audio

विकिमिडिया फाउंडेशन चे ध्येय विधान आमच्या सद्य उपक्रमांचे व उद्देशाचे, आमच्या प्रकल्पांच्या व्याप्तीचे आणि आमच्या मूळ मूल्यांचे वर्णन करते. हे विधान दृष्टी विधान च्या अगदी विपरीत असते. आमचे ध्येय विधान—जे 'संघटना नियमावली' मधील संक्षिप्त आवृत्तीचेच सविस्तर रूप असून, एप्रिल २००७ मध्ये मंडळाच्या ठरावाद्वारे मंजूर करण्यात आले होते—ते खालीलप्रमाणे आहे:

विकिमीडिया फौंडेशनचे ध्येय जगभरातील लोकांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे हे आहे.

वैयक्तिक स्वयंसेवकांचे जाळे आणि आमच्या स्वतंत्र चळवळ संस्था—ज्यामध्ये मान्यताप्राप्त प्रकरणे, विषय-आधारित संस्था, वापरकर्ता गट आणि भागीदारांचा समावेश आहे—यांच्या समन्वयाने, ही संस्था बहुभाषिक विकी प्रकल्पांच्या तसेच या उद्दिष्टाची पूर्तता करणाऱ्या इतर उपक्रमांच्या समर्थनार्थ आणि विकासासाठी आवश्यक ती पायाभूत सुविधा व संस्थात्मक आराखडा उपलब्ध करून देते. ही संस्था आपल्या प्रकल्पांमधील उपयुक्त माहिती इंटरनेटवर विनामूल्य आणि कायमस्वरूपी उपलब्ध करून देईल.

विधानेची शब्दरचना बदलण्याबाबतचे प्रस्ताव मोहीम / अस्थिर येथे सादर केले जावेत; तसेच या प्रस्तावांचा आढावा किमान वार्षिक (दरवर्षी) घेतला जाईल.

आमचे नियम, दृष्टिकोन आणि मूल्ये देखील पहा.

AltStyle によって変換されたページ (->オリジナル) /